गर्दी पाहून दुकानदारांनी थाटली दुकाने
यंदा पावसाच्या सरीमुळे हिमायतबाग परिसरात असलेल्या तलावात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे हे निसर्गरम्य ठिकाण अतिशय सुंदर झाले आहे. हे ठिकाणी पर्यटकांसाठी आकर्षण बनले आहेत. हे दृश्य पाहण्यासाठी प्रतिदिन पर्यटक याठिकाणी गर्दी करत आहेत. ही गर्दी लक्षात घेऊन दुकानदारांनी देखील याठिकाणी आपली दुकाने थाटली आहे. यामुळे या ठिकाणाला पर्यटन स्थळांचे स्वरूप आले आहे.
यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यात शहरात विविध ठिकाणी तलाव भरून वाहताना दिसत आहे. काही ठिकाणी पर्यटक देखील गर्दी करत आहेत. हिमायतबाग परिसरात असलेला तलाव यंदाचे आकर्षण ठरले आहे. याठिकाणी धबधबा निर्माण झाला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी याठिकाणी प्रतिदिन पर्यटक गर्दी करत आहेत. अनेकजण या पाण्याचा आनंद घेत आहेत. याशिवाय काहीजण हे दृश्य आपल्या कॅमेरात टिपण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे. सेल्फी काढण्यासाठी देखील तरुण मंडळी याठिकाणी प्रतिदिन गर्दी करतात.
दुकानदारांनी थाटले दुकाने
हिमायतबाग भागातील तलाव पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. ही गर्दी लक्षात घेता छोट्या -छोट्या दुकानदारांनी आपली दुकाने थाटली आहेत. आधीच शहरातील विविध ठिकाणी असलेले पर्यटन स्थळे कोरोनामुळे बंद असल्याने अनेक छोट्या छोट्या दुकानदारांचे त्यामुळे नुकसान झाले आहे. परंतु आता हिमायतबाग या भागाला पर्यटन स्थळाचे स्वरूप निर्माण झाल्याने याठिकाणी चणे, फुटाणे विक्रेते तसेच मक्याचे कणीस, फळे विक्रेत्यांसह आदी दुकानदारांनी याठिकाणी दुकाने थाटून आपला व्यवसाय सुरू केला आहे. दरम्यान, खामनदीला आलेल्या पुरामुळे हिमायतबाग परिसरातील तलाव ओव्हर फ्लो झाल्याने हजारो नागरिक येथे येत आहेत. परंतु भूमिगत योजनेअंतर्गत असलेले गटार फुटल्याने या गटाराचे पाणी हिमायतबाग परिसरातील तलावात मिसळू लागल्याने पर्यटकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केलेले दिसत आहे.